BEED24

कोविड़ योद्ध्यांच्या हस्ते शिक्षण संस्थेत ध्वजारोहन…

वडवणी दि.२७ (प्रतिनिधी):-संपुर्ण देशात कोरोना महामारीने थैमान घातले. जुलै-ऑगस्ट मधे कोरोनाने गावागावात शिरकाव केला. जनता भयभीत झाली. कोणीच कुणाच्या मदतीला जात नव्हते. ऐवढेच नव्हे तर मृत (Dead) वडिलांना अग्नीड़ाग देण्यास मुलगाही जात नव्हता अशा भिषण परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, नर्स यांनी स्वतःची व कुटूबांची पर्वा न करता कोविड़ रूग्णांच्या मदतीला धावुन आले. अशा कोविड योध्द्यांच्या हस्ते ध्वजारोहन करुन त्यांचा सन्मान करण्याचा अनोखा ध्वजवंदन सोहळा मकरध्वज शिक्षण संस्थेने ढेकणमोहा व चिंचवण येथे केला.

तुटपुंज्या व्यवस्थेवर कधी ॲलोपॕथीचा तर कधी आयुर्वेदाचा आधार घेत कोरानाग्रस्त निगेटिव्ह करत रूग्णांना डॉक्टरांनी धिर दिला. जिल्ह्यातील शासकिय व खाजगी प्रॕक्टीस करणाऱ्या डॉक्टरांनी कोरोनावर नियंत्रण मिळवत मृत्यूदरही कमी केला. कोरोना (corona) काळात देवाच्या रूपाने डॉक्टर दिसले. अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांचा मकरध्वज शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. सोमनाथ बडे यांनी सन्मान करत गोरक्षनाथ विद्यालय ढेकणमोहा येथे डॉ. सचिन आंधळकर (वैद्यकीय अधिकारी जिल्हा रूग्णालय बीड (Beed)) यांच्या हस्ते ७२ व्या प्रजासत्ताक दिना निमीत्त ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी डॉ. अमित काळे, डॉ.किरण सवासे यांचा गौरव करण्यात आला. तर भगवानबाबा विद्यालय चिचंवण येथे डॉ. अर्चनाताई करमाळकर, परिचारीका मुंड़े ताई यांच्या हस्ते ध्वजारोहन करत डॉ. करमाळकर, कोविड (Covid) सेटंरचे इन्चार्ज डॉ. नाईकनवरे, लॕब टेक्नीशीयन पवार, वार्ड़बाॅय शशिकांत चिलगर, लहु खारगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मकरध्वज शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. सोमनाथ बडे, सरपंच प्रकाश ठाकुर, प्राचार्य चाटे सर, पर्यवेक्षक एम.एन. वाघमारे, उपप्राचार्य सातपुते सर, ग्रांमपंचायत सदस्य, पोलीस पाटील व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन क्रिडा शिक्षक थापड़े सर, चौरे सर यांनी केले. तर डि. एस.मुंडे यांनी सुत्रसंचालन केले. चिचंवण येथे संस्थेचे अध्यक्ष आसारामजी बडे, मयुर बडे, सरपंच राम मात्रे, उपसरपंच बालासाहेब बडे, मुख्याध्यापक सिरसट, पर्यवेक्षक राजेभाऊ बडे, क्रिडा शिक्षक महादेव रक्टे, नखाते सरसह ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मृत्यु पावलेल्या रूग्नांच्या आठवणीने वेदना होतात- डॉ. सचिन आंधळकर

कोरोना (corona) महामारीने बीड (Beed) जिल्ह्यात उद्रेक माजविला. रूग्न बरे करण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करत कोरोना आटोक्यात आणला. पण काही रूग्न निगेटिव्ह करण्यास आम्ही अपयशी ठरलो. दुरूस्त झालेल्या रूग्नाचां आनंद आहेच पण आमच्या डोळ्या समोर मृत्यु (Dead) पावलेल्या रूग्नांच्या आठवणीने वेदना होतात. आम्ही केलेल्या कामाची नोंद घेत आमचा सन्मान केल्या बद्दल प्रा.सोमनाथ बडे सह संस्थेचे आभार. अशा प्रतिक्रिया देत विद्यार्थ्यांनी शाळेत आल्यावर कोरोना नियमाचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला डॉ. आंधळकर यांनी यावेळी दिला.

Exit mobile version