BEED24

Flood victims धारुर तालुक्यात पुराचा तिसरा बळी ; आईच्या डोळ्यादेखत बालक गेला वाहून.

किल्लेधारुर दि.17 सप्टेंबर – Flood victims धारुर तालुक्यात गेल्या काही दिवसात होत असलेल्या तुफान अतिवृष्टीत आत्तापर्यंत पुरात वाहुन जावून तिघांचा बळी गेला. काल दि.16 मंगळवार रोजी तालुक्यातील मोहखेड येथे आईसह ओढा उलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन वर्षाच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली.

मोहखेड (ता.धारुर) येथे नाल्याला आलेल्या पुरातून आई सोबत घराकडे जात असताना मुलाचा वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली. राम प्रकाश गवळी (वय 2 वर्षे ) असे मयत मुलाचे नाव आहे. मोहखेड शिवारात मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता ढगफुटी सदृष्य पाऊस झाला. पाऊस संपल्यानंतर साडेचार वाजण्याच्या सुमारास शेतात शेळ्यांना चारा देण्यासाठी गेलेले आई राधाबाई, दोन मुली एक मुलगा राम असे आई सोबत गावाकडे येत होते . यावेळी नाल्याच्या पुरातून दोन मुलीला दुसऱ्या बाजूला सोडण्यासाठी आई गेली होती .दरम्यान दोन वर्षाच्या मुलास नाल्याच्या बाजूला उभा करण्यात आले होते . मुलींना नाल्यातून सोडत असताना पाण्याचा प्रवाह वेगवान असल्यामुळे दोन मुली हातातून निसटून काही अंतरावर वाहून गेल्या . त्यानंतर परिसरातील नागरिकांनी धावपळ करून त्यांना वाचवले. दरम्यान उभा असलेला मुलगा पाण्यात गेल्याने तोही वाहून गेला . त्याला नागरिकांनी शोधले परंतु त्याचा मृत्यू झाला होता . त्यास मोहखेड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आले. दरम्यान मागिल काही दिवसात पुरात वाहून जावून मृत्यू पावण्याची ही तिसरी घटना असून अजूनही पावसाच्या धारा सुरुच आहेत.

Exit mobile version