BEED24

मिराबाई चानूपाठोपाठ कुस्तीपटू प्रिया मलिकने भारतीयांची मान उंचावली; भारताला सुवर्णपदक.

नवी दिल्ली दि.25 जुलै – टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2021) मिराबाई चानूने (Mirabai Chanu) ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये (Weightlifting) रौप्यपदक जिंकत इतिहास रचल्यानंतर जागतिक कुस्ती (Wrestling) स्पर्धेत भारताच्या हाती मोठं यश आलं आहे. कुस्तीपटू प्रिया मलिकने (Priya Malik) भारतीयांच्या माना उंचावल्या असून हंगेरी येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं आहे. प्रिया मलिकने मिळवलेल्या सुवर्ण पदकामुळे (Gold medal) आनंद व्यक्त होत आहे.

(Following Mirabai Chanu, wrestler Priya Malik raised the profile of Indians; India won the gold medal.)

प्रिया मलिकने (Priya Malik) जागतिक कुस्ती (Wrestling) स्पर्धेच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची (Gold medal) कमाई केली आहे. प्रिया मलिकने बेलारुसच्या कुस्तीपटूला 5-0 ने पराभूत करत सुवर्णपदक आपल्या नावे केलं आहे. प्रिया मलिकने याआधी 2019 मध्ये पुण्यात खेलो इंडियात सुवर्णपदक व दिल्लीतील 17 व्या स्कूल गेम्समध्ये सुवर्णपदक आणि 2020 मध्ये पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कॅडेट चँपियनशिपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केलेली आहे.

मिराबाई चानूने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये शनिवारी रौप्यपदक जिंकत इतिहास रचला. मिराबाई चानूने 49 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करीत देशाचे पदकांचे खाते उघडले आणि समस्त भारतीयांना सुखद भेट दिली. तर मणिपूरच्या प्रिया मलिक या पोलादी महिलेने जागतिक कुस्ती स्पर्धेत एकूण 202 किलो वजन उचलण्याची कामगिरी करताना कुठेही चेहऱ्यावरील आत्मविश्वास कमी पडू दिला नाही. तिने 87 किलो स्नॅच प्रकारात तर 115 किलो क्लीन अ‍ॅण्ड जर्क प्रकारात उचलले. टोकीया ऑलिम्पिकसह जागतिक कुस्ती स्पर्धेत मिळालेल्या या यशामुळे भारतीयांची मान उंचावली आहे.

Exit mobile version