BEED24

Forcible theft भर दिवसा जबरी चोरी ;सात लाखाचा ऐवज लंपास .

किल्लेधारूर दि.8 नोव्हेंबर – Forcible theft तालूक्यातील शिंगणवाडी येथे गुरूवारी दुपारी तिन घराचे दरवाजे तोडून अज्ञात चोरट्यानी सोन्या चांदीचे दागिने व नगदी पैसे असे सात लाख रुपयाचा माल अज्ञात चोरट्यानी लंपास केला. या प्रकरणी सिरसाळा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

तालूक्यातील शिंगणवाडी येथे गुरूवार दि 7 नोव्होंबर रोजी दुपारी कृष्णा महादेव जाधव यांच्या घराचे तीन दरवाजे तोडून जबरी चोरी झाली आहे. जवळजवळ सोने व पैसे मिळून 7 लाख रुपये इतकी रक्कम भर दुपारी तीन घराचे दरवाजाचे कुलप तोंडून आज्ञात चोरांनी घर फोडून चोरी केली. सध्या शिंगणवाडी येथील ग्रामस्थ भयभीत आहेत. सिरसाळा पोलीस स्टेशनचे पोलीस पुढील तपास करत आहेत. सिरसाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास करत आहेत.

 

Exit mobile version