BEED24

धारुर पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब खाडे यांचे निधन.

किल्लेधारूर दि.7 नोव्हेंबर – धारूर पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब उर्फ परमेश्वर खाडे यांचे रविवारी (दि.6) रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने कांदेवाडीसह परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
(Former Chairman of Dharur Panchayat Samiti Balasaheb Khade passed away.)

कांदेवाडी ता.धारूर (Dharur) येथील रहिवाशी असलेले व आ.प्रकाश दादा सोळंके (Prakash Solanke) यांचे कट्टर समर्थक म्हणुन परिचित असलेले बाळासाहेब उर्फ परमेश्वर पंढरीनाथ खाडे हे गेल्या कांही दिवसांपासुन अल्पशा आजाराने आजारी होते. त्यांच्यावर उपचार चालु असतानाच रविवारी दुपारी त्यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात कांदेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते. स्व.बाळासाहेब खाडे हे विद्यार्थी दशेपासुनच सामाजिक कार्यात सक्रिय होते. नंतर ते आ.प्रकाश दादा सोळंके यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी आ.सोळंके यांच्या नेतृत्वाखाली भोगलवाडी पं.स गणातुन पं.स.निवडणूक लढवुन ती जिंकुन धारूर पंचायत समितीचे सभापती झाले होते. त्यांच्या दु:खद निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रध्दांजली वाहिली.

Exit mobile version