BEED24

पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाकडून माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड….

पदवीधरसाठी भाजपाकडून माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड….constituency

किल्लेधारूर दि.३०(वार्ताहर) पदवीधर मतदार संघाच्या आगामी निवडणूकीत Election या मतदारसंघाचे  दोन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड Jaysingrao Gaikwad यांना भाजपाकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी मराठवाड्यातून  पुढे येत आहे. आपला माणूस म्हणून ओळख असलेल्या माजी खा.गायकवाड यांंना या मतदारसंघात constituency काम करण्याचा मोठा अनुभव असुन भाजपा या मागणी बाबत काय निर्णय घेईल याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

सध्या मराठवाड्यात पदवीधर मतदारसंघ constituency निवडणूकीचे Election वारे वाहू लागले आहेत. संभाव्य व इच्छूक उमेदवारांनी मतदारसंघात दौराही सुरु केल्याचे दिसत आहे. मात्र भारतीय जनता पार्टीकडून अद्यापही उमेदवारी बाबत कोणतेही नाव पुढे आलेले नाही. अशा वेळी मराठवाड्यातील पदवीधर मतदारांतून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात constituency माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड Jaysingrao Gaikwad यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी होत आहे. जयसिंगराव गायकवाड यांनी या पदवीधर मतदारसंघाचे दोन वेळा विजय मिळवत प्रतिनिधित्व केले आहे. तर याच मतदारसंघाचे नेतृत्व करत असताना त्यांनी सर्वप्रथम राज्याचे सहकार राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. यानंतर तब्बल तीन वेळा बीडचे खासदार म्हणून विक्रमी मतांनी विजय मिळवत केंद्रीय राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सध्या भाजपाच्या राष्ट्रीय किसान मोर्चाचे सरचिटणीस पद सांभाळणारे गायकवाड यांनी यापूर्वी अनेक जबाबदाऱ्या लिलया पार पाडल्या आहेत. दांडगा राजकीय अभ्यास व मराठवाड्यातील तळागाळापर्यंत आपला माणुस म्हणून ओळख असलेल्या जयसिंगराव गायकवाड Jaysingrao Gaikwad यांना उमेदवारी देण्याची मागणी पदवीधर मतदारांतून केली जात आहे.

 

Exit mobile version