अथणी दि.28 जून – कोल्हापूरपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या अथणी तालुक्यातील हळ्याळ गावात कृष्णा नदीत (Krishna river) चार सख्खे भाऊ बुडाल्याची घटना आज दि.28 सोमवार रोजी घडली. बुडालेल्या चौघांचा शोध एनडीआरएफ पथक (NDRF) व पोलिसांच्या (Police) मदतीने सुरु आहे.
(Four brothers drowned in the river; NDRF and police search operation begins.)
बेळगाव (कर्नाटक) जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील हळ्याळ गावात पिराचा उरुस असल्याने घरातील धुण्यासाठी गेलेले सख्खे चार भाऊ कृष्णा नदीत (Krishna river) बुडाले. अथणी तालुक्यातील (Athani) हळ्याळ येथे सोमवारी (28) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सदाशिव गोपाळ बनसोडे (वय 24), परशराम गोपाळ बनसोडे (वय 36), दरयाप्पा गोपाळ बनसोडे (वय 22) व शंकर गोपाळ बनसोडे (वय 18) अशी बुडालेल्या भावांची नावे आहेत. एनडीआरएफ पथक (NDRF) व पोलिसांच्या (Police) मदतीने शोधकार्य सुरु आहे.
अशी घडली घटना..
धुण्यासाठी उतरलेले सदाशिव बनसोडे हे कृष्णा नदीच्या पाण्यात पाय घसरून पडल्याने सर्वप्रथम बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी परशराम, दरयाप्पा व शंकर हे धावले असता तेही वाहून जावून पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली.
घटनास्थळी अथणीचे (Athani) तहसीलदार दुंडाप्पा कोमार, पोलिस उपाधिक्षक एस. व्ही. गिरीश, मंडल पोलिस निरीक्षक शंकरगौडा बसगौडर, उपनिरीक्षक कुमार हाडकर यांनी भेट देऊन तात्काळ बचावकार्य सुरु केले. सध्या येडूर येथून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.
अथणी अग्निशामक दल, अथणी पोलिस ठाण्याचे कर्मचारी व परिसरातील पोहण्यात तरबेज असलेली मंडळी बुडालेल्या चारही भावांचा शोध घेत आहेत. कृष्णानदी तुडूंब भरल्याने शोधकार्यात व्यत्यय येत आहे. मात्र शोधकार्य सुरुच आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत या भावांचा शोध लागलेला नव्हता. आज सकाळी पुन्हा शोध मोहिम सुरु करण्यात येत आहे.
दोन विवाहीत तर दोघे अविवाहीत.
बुडालेल्या चार भावापैकी दोघांची लग्न झालेली असून दोघे अविवाहित आहेत. परशराम बनसोडे यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली तर शंकर यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा, मुलगी आहेत. तर सदाशिव व दरयाप्पा हे अविवाहित असल्याचे समजते.