कराड दि.७ – पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वहागाव (ता. कराड) गावच्या हद्दीत चार चाकी स्विफ्ट डिझायर व ट्रकच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात (Accident) चार जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याचे पाेलिसांकडून (Police) सांगण्यात आले. आज (रविवार) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामधील जखमींना उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती नूसार एम.एच-07-ए.बी-5610 या क्रमांकाची स्विफ्ट डिझायर पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरुन कोल्हापूर कडून पुण्याकडे निघाली होती. दरम्यान वहागाव (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत आल्यानंतर संबंधित गाडी अचानक रस्ता क्राँस करुन कोल्हापूर लेनवर आदळली. त्यावेळी ट्रकशी झालेल्या धडकेत तीन जण जागीच ठार झाले. अन्य दोन जण गंभीर जखमी झाले हाेते. त्यातील एक जण दुपारी तीननंतर मृत झाल्याचे सांगण्यात आले. संबंधित प्रवाशांची नावे दुपारी सव्वा तीन पर्यंत समजली नव्हती. हा अपघात (Accident) घडला त्यावेळी संबंधित गाडी पुणे बाजूच्या लेनवरुन कोल्हापूर बाजूला जाणाऱ्या लेनवर उभी राहिली. या अपघाताची माहिती समजताच वहागाव परिसरातील ग्रामस्थांनी महामार्ग परिसरात धाव घेऊन जखमींना मदत केली. त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कराडला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान संबंधित वाहन हे सिंधूदूर्ग (कुडाळ) येथील असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नाेंदणीनूसार असून या अपघातामधील मृत व जखमी व्यक्ती सिंधुदुर्ग (कुडाळ) जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी (Police) कडून समोर आली आहे.