किल्ले धारूर दि.29 जुलै – Freestyle fight धारुर Dharur तालुक्यातील जोड हिंगणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खिचडी शिजवण्याचं काम करणारी महिला व शिक्षिकेमध्ये वाद झाला. दोघीं शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसमोर अक्षरशः एकमेकीचे केस ओढून मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आला असून याची सर्वत्र चर्चा होत आहे. ( Freestyle fight between two women over Khichdi in Dharur taluka; The video went viral.)
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारुर Dharur तालुक्यातील जोड हिंगणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिली ते चौथी वर्गामध्ये जवळपास 60 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार म्हणून खिचडी शिजवणारी महिला विद्यार्थ्यांना पुरेशी खिचडी न देणे, बिस्किट देण्याच्या दिवशी अक्षरशः दोन बिस्किटावर विद्यार्थीची बोळवण करणे यासह दर्जेदार पोषण आहार न देता ओबडधोबड प्रमाणात विद्यार्थ्यांच्या ताटात खिचडी टाकणे असा प्रकार सातत्याने होत असल्याने शाळेतील एका शिक्षिकेने महिलेस विद्यार्थ्यांना पोट भरून पुरेसा पोषण आहार देण्याची मागणी केली. यामुळे खिचडी शिजवणारी महिलेने शिक्षिके बाबत उलट सुलट चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
दि. 28 जुलै शुक्रवार रोजी अशाच कारणाने सदरील महिलेने ज्ञानार्जनास आलेल्या शिक्षिकेसोबत हुज्जत घातली. यावेळी शिक्षकेने ही त्या महिलेस तू किमान विद्यार्थ्यांना दोन बिस्किट देत जा असे म्हणत विद्यार्थ्यांना पुरेसं अन्न देण्याची पुन्हा मागणी केली असता सदरील महिलेने पतीसह शाळेत उपस्थिती लावत शिक्षिकेसोबत हुजत घालत मारहाण Freestyle fight केली. सदर प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून याप्रकाराची चांगलीच चर्चा होत आहे. सदर मारहाण प्रसंगी खिचडी शिजवणाऱ्या महिलेचा पती शाळेमध्ये वाद होण्यापूर्वीच कसा आला हा झालेला वाद पूर्वनियोजित होता का असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत गटशिक्षण अधिकारी गणेश गिरी यांनी दोन मुख्याध्यापकांची समिती नेमून सदर प्रकाराची चौकशी करणार असल्याची माहिती दिली.
शालेय समितीच्या अध्यक्षाची आईचं शिजवते खिचडी…
जिल्हा परिषदेच्या या शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षाची आईचं शालेय पोषण आहार शिजवते. त्यांच्या कडून पुरेसा व दर्जेदार आहार दिला जात नाही. यामुळे शिक्षिका या नात्याने त्यांना दर्जेदार व पुरेसा आहार देण्याची मागणी केली. याकारणाने त्यांच्या पतीने माझा हात पकडून मारहाण करत ॲट्रासिटीचा गुन्हा नोंदवण्याची धमकी दिली. रेखा डोंगरे व अश्विनी गवळी यांच्या कडून माझ्या जिविताला धोका असून मी प्रचंड माणसिक तणावात आहे. सदर प्रकाराची तक्रार गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. …. शोभा कोरडे (शिक्षिका)