BEED24

बहिणीचा खून करणाऱ्या फरार भावासह मित्राच्या केज पोलिसांनी मुसक्या आवळल्या;

केज दि.27 एप्रिल – केज तालुक्यातील बोरगाव येथे आईला भेटण्यास आलेल्या बहिणीचा भावाने मित्राच्या मदतीने डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून (Murder) केला होता. त्यानंतर ते दोघेही फरार झाले होते. भावासह त्याच्या मित्रास केज पोलिसांनी काल दि.26 सोमवार रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट येथील एका शेतातून अटक (Arrested) केली आहे.

(Friend’s Kaij policeman smiles with fugitive brother who murdered sister;)

केज तालुक्यातील बोरगाव येथे राहत असलेल्या आईस पाडव्याच्या सणानिमित्त पुणे येथून भेटण्यासाठी शीतल लक्ष्मण चौधरी (28) आल्या होत्या. मयताचा भाऊ दिनकर गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर दोन्ही (रा. बोरगाव) यांनी 20 एप्रिल रोजी मध्यरात्री दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणातून बहिण शीतल यांचा खून (Murder) केला होता.

दरम्यान, खून केल्यानंतर आरोपी भाऊ दिनकर गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर वळेकर हे दोन्ही आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी मयताचा चुलत भाऊ नानासाहेब जालिंदर गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलीस (Police) ठाण्यात दिनकर गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर वळेकर याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

केज पोलीस (Police) ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दोन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना केली होती. आरोपींचा शोध घेत असताना दोन्ही आरोपी उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट येथे शेतात लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरुन केज पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम काळे, दिलीप गीते, वैभव राऊत यांनी बहिणीचा खून करणाऱ्या दिनकर गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर या दोन्ही आरोपींना शेतातून 26 एप्रिल रोजी अटक (Arrested) केली.

खूनाच्या घटनेनंतर सदरील प्रकार का व कोणत्या कारणाने घडला या बाबत तर्क वितर्क लावले जात होते. मात्र, निर्दयीपणे सख्ख्या बहिणीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करणाऱ्या भाऊ व भावाचा साथीदार मित्र पोलिसांच्या ताब्यात आल्यामुळे खुनाचे कारण स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version