BEED24

महाविकास आघाडी सरकारची गोरगरीबांच्या सेवेची स्वप्नपूर्ती करा- माधव निर्मळ

किल्लेधारूर दि.६(वार्ताहर) येथील नवनिर्वाचित संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्ष व सदस्यांचा सत्कार नर्मदा उद्योग समुहाचे प्रमुख माधव निर्मळ यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी संजय गांधी निराधार समिती असून या माध्यमातून पात्र निराधार, अपंग, परित्यक्ता व वंचितांची सेवा नवनिर्वाचित समिती अध्यक्ष व सदस्यांनी करावी असे म्हणत पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) व आ.प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) यांनी दिलेल्या जबाबदारीतून महाविकास आघाडी सरकारची गोरगरीबांच्या सेवेची स्वप्नपूर्ती करावी असे मत माधव निर्मळ (Madhav Nirmal) यांनी व्यक्त केले.

यावेळी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष बालासाहेब मायकर, सदस्य प्रदिप नेहरकर, नारायण कुरुंद, आशोक काळे, सुधीर गुळवे, बंडू मस्के, आशोक तिडके उपस्थित होते. शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा संगायो सदस्य नारायण कुरुंद यांनी शिवसेना (Shiv Sena) प्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke), शिवसेनेचे (Shiv Sena) जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी टाकलेली जबाबदारी सार्थ ठरवून सर्व वंचिताना न्याय देण्यासाठी नवनिर्वाचित समिती प्रयत्न करेल असे आश्वासित केले. यावेळी राष्ट्रवादीचे (NCP) जिल्हा सरचिटणीस सय्यद शाकेर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सिध्देश्वर रंदवे, राष्ट्रवादीचे (NCP) शहराध्यक्ष नितिन शिनगारे, गटनेते सुधीर शिनगारे, नगरसेवक राजूसेठ कोमटवार, माजी नगरसेवक मदन धोतरे, सय्यद हारुण, विश्वास शिनगारे यांची उपस्थिती होती. माधव निर्मळ (Madhav Nirmal) यांनी पुढे बोलताना पालकमंत्री धनंजय मुंडे व आ.प्रकाशदादा सोळंके यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सन्मान देवून सेवेची संधी दिली त्याचा उपयोग वंचितांना न्याय देण्यासाठी करण्याचे आवाहन केले.

Exit mobile version