बीड जिल्ह्यात पुन्हा सामुहिक अत्याचार; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या.

बीड दि.28 एप्रिल – बीड (Beed) जिल्ह्यात एका जवळच्या नातलग असलेल्या चुलत पुतण्याने चुलती बरोबर केलेल्या कृत्याची निंदा होत असताना बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Guardian Minister Dhananjay Munde) यांच्या मतदारसंघात सामुहिक अत्याचाराची (Gang Rape) दुसरी घटना समोर आली आहे. यामुळे वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या 4 दिवसांपूर्वीचं बीड जिल्ह्यात सामुहिक बलात्काराची घटना घडली होती. आज पुन्हा एकदा सामुहिक बलात्काराच्या घटनेने बीड (Beed ) जिल्हा हादरला आहे. बीड जिल्ह्यात परळी (Parli) तालुक्यातील मिरवट गावांमध्ये, शेतात काम करत असणाऱ्या एका 22 वर्षीय विवाहितेवर दोन नराधमांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडें यांच्याच मतदारसंघात ही घटना घडल्यामुळे एकचं खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार मिरवट गावातील 22 वर्षीय पीडीत महिला ही शेतात आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. काल पीडिता आपल्या शेतातील घरालगत शेतात काम करत होती. या दरम्यान अंगद केशव भदाडे (वय 40) रा. मिरवट व साजन तिडके (वय 30) रा. भोगलवाडी ता.धारुर (Dharur) या नराधम आरोपींनी पीडिता एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. याविषयी कोणाला सांगितलं तर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारू अशी धमकी दिली.
याप्रकरणी 22 वर्षीय पीडितेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस (Police) ठाण्यात नराधम आरोपीविरोधात 376(ड), 323, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी नराधमानां अवघ्या 3 तासात परळी ग्रामीण पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. पुढील तपास परळी पोलिस करत आहेत.
दरम्यान, मागिल चार दिवसांपूर्वीच बीड तालुक्यातील बेलूरा गावातील 24 वर्षीय विवाहितेवर, चुलत पुतण्यासह गावातीलच 4 जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच परळी तालुक्यात पुन्हा सामुहिक बलात्काराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. अशा घटनांमुळे बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.
( Gang-rape again in Beed district; The police caught both of them smiling. )