BEED24

Ganja cultivation.. धारुर हद्दीत चक्क गांजाची शेती… ! पंकज कुमावत यांच्या पथकाकडून कारवाई.

किल्लेधारुर दि.13 अॉक्टोंबर – Ganja cultivation धारुर पोलिस हद्दीत मौजे पिंपरवाडा शिवारात चक्क गांजाची शेती होत असल्याचे उघडकीस आले असून सहा. पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने कारवाई करत एक लाख चौरेचाळीस हजार रुपयांचा माल हस्तगत केला. Ganja cultivation in Dharur area… ! Action by Pankaj Kumawat’s team.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार दि.12 गुरुवारी रोजी केज उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारामार्फत मौजे पिंपरवाडा ता.धारुर शिवारात इसम नामे लक्ष्मण जयवंत तिडके रा. भोगलवाडी हा स्वतः चे फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीर रित्या गांजाची झाडे (Ganja cultivation ) लावून त्याचे संवर्धन करून जोपासना करीत आहे. अशी खात्रीपूर्वक माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी पंकज कुमावत व त्यांच्या पथकातील कर्मचारी बाळासाहेब डापकर, दिलीप गित्ते, अनिल मंदे, गोविंद मुंडे व पोलीस ठाणे धारूर Dharur Police येथील सहा. पोलीस निरीक्षक विजय आटोळे, पोलीस कर्मचारी वसंत भताने, कदम, गायसमुद्रे, शेख यांनी संयुक्तपणे छापा मारला असता 28 किलो वजनाचा किमती 144520/ रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. आरोपी नामे लक्ष्मण जयवंत तिडके याचे विरुद्ध एनडिपीएस (NDPS) कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर प्रकरणात धारुर पोलिस Dharur Police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय विजय आटोळे करत आहेत.

Exit mobile version