BEED24

शेतकऱ्यांसाठी खुषखबर… बीडसह या जिल्ह्यात पुढील दोन दिवस हवामान खात्याचा इशारा.

मुंबई दि.20 मे – राज्यात सध्या सर्वांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. यंदा मान्सूनही अंदमानात वेळेआधीच दाखल झाला आहे. दरम्यान आता ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. पूर्वमौसमी पावसाने शेतकरी आनंदित झाला आहे. पुढील दोन दिवस बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली व उस्मानाबाद जिल्ह्यांत पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह जोरदार वाऱ्यांची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मंगळवारी रात्री लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने (unseasonal rains) जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर अनेक ठिकाणी पावसामुळे भाजीपाला आणि फळबागांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतशिवारातील उन्हाळी सोयाबीनच्या बनिमी वाऱ्यात उडून गेल्या आहेत. अनेक ठिकाणी आंब्याच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, हालसी, तुगाव, तगरखेडा, हलगरा, सावरी गावामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

महाराष्ट्रात बुधवारी नागपूरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. नागपूरसह विदर्भाच्या काही भागात रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. गुरुवारी सकाळपासून ढगाळ हवामान असून, तापमानातंही मोठी घट नोंदवली गेली आहे. राज्यातील कोकण किनारपट्टी भागात त्याचप्रमाणे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस बरसेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार वारे, मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली व उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह जोरदार वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पूर्वमौसमी पावसाने खरिप पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे.

येत्या चार ते पाच दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

( Good news for farmers … Meteorological Department warning for next two days in this district including Beed. )

Exit mobile version