BEED24

दसऱ्या पाठोपाठ ईद ए मिलाद साठीही शासनाचे निर्देश

मुंबईः-दि.२४- सध्या साजरा होत असलेल्या नवरात्रोत्सव व दसरा सणाबाबत राज्य शासनाने उत्सव साध्या पध्दतीने साजरे करण्याच्या निर्देशानतर काल दि.२३ रोजी नवीन परिपत्रक काढत राज्य शासनाने दि.३० आक्टोंबर रोजी साजरी होत असलेल्या ईद ए मिलादुन्नबी साठी साध्या पध्दतीने साजरी करण्याचे निर्देश दिले आहेत.

गेल्या आठ महिन्यापासून देशात कोरोना रोगाने थैमान घातलेले आहे. कोरोना प्रादुर्भाव थांबवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध उपक्रम राबवित आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आजही अनेक निर्बंध लावलेली आहेत. गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेला नवरात्रोत्सव व उद्या साजरा होत असलेला दसरा सण अशाच निर्बंधात संपन्न होत आहे. राज्यात येत्या ३० आक्टोंबर रोजी इस्लामचे प्रेषीत मंहमद पैगंबर यांचा जन्मदीन ईद ए मिलादुन्नबी म्हणून उल्हासात साजरा होत आहे. परंतू राज्य शासनाने काल याबाबतीत परिपत्रक काढून कोविड-१९ चे सर्व नियम पाळून प्रतिकात्मक पध्दतीने मिरवणूक काढून साध्या पध्दतीने ईद साजरी करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

(आपल्या परिसरातील घटना घडामोडी पाठवा अन स्वतः बातमीदार व्हा…. व्हाट्सअप क्रमांक  9421944568)

Exit mobile version