BEED24

आज मोठा दिलासा…बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट; बीडची संख्या शंभरच्या आत.

बीड दि.1 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 3719 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 361 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3430 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्याची संख्या पाचशेच्या आत आल्याने आज मोठा दिलासा मिळाला आहे.

(Great relief today … Today’s Corona update in Beed district; The number of beads is within a hundred.)

आज बीड तालुक्यात अनेक दिवसानंतर शंभरच्या आत 70 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यातील बीड पाठोपाठ सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यात गेल्या काही दिवसांत संख्या झपाट्याने उतरली आहे. आज अंबाजोगाईत केवळ 30 व आष्टी तालुक्यात 60 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 17 तर केजमध्ये 44 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-70, अंबाजोगाई-30, आष्टी-60, धारुर-17, गेवराई-24, केज-44, माजलगाव-29, परळी-12, पाटोदा-29, शिरुर-28, वडवणी-18 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये आहे. मात्र जिल्ह्यात नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दिवसेंदिवस कमी होत असून आज पाचशेपेक्षा कमी रुग्ण संख्या आली आहे. पॉझिटीव्हीटी रेट 20 टक्क्याच्या आत आला आहे. दरम्यान जिल्ह्यात लॉकडाऊन (lockdown) मध्ये वाढ करत 15 जूनपर्यंत वाढवण्यात आला असून अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सकाळी 7 ते 11 पर्यंत खुल्या राहणार आहेत.

दरम्यान, सोमवारी राज्यात केवळ 15,000 नवीन रुग्ण आढळले असून गेल्या 5 मार्चनंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. आणखी एक दिलासा म्हणजे संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारनं केलेल्या प्रयत्नांनाही यश मिळून येताना दिसून दिसत आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 15,077 नवे रुग्ण आढळले. आत्तापर्यंत महाराष्ट्रात 57,46,892 कोरोनाग्रस्त आढळले.तर गेल्या 24 तासांत 184 रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच एका दिवसात 33,000 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्याच वेळी, सध्या राज्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 2,53,367 इतकी आहे. राजधानी मुंबईत कोरोनाचे फक्त 676 नवीन रुग्ण आढळले आहेत. शहराचा रिकव्हरी दरही 94 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर एका दिवसात 5570 रुग्ण बरे झाले आहे. आतापर्यंत 6,66,796 लोक या आजाराने बरे झाले आहेत. आकडेवारीनुसार, शहरातील कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 22,390 आहे.

Exit mobile version