BEED24

जयंती निमित्त गोपीनाथगडावर मान्यवरांकडून अभिवादन….

परळीःदि.१२-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांचे काका स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे (Gopinath Munde) यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी परळी तालुक्यातील गोपीनाथ गड (Gopinath Gad) येथे जाऊन जयंतीनिमित्त अभिवादन केले.

गोरगरीब, दीन दुबळ्यांची सेवा करण्याचा, संघर्षाचा वसा आणि प्रेरणा घेऊन काम करतो आहे. आजही तुम्ही आमच्यात नाहीत ही गोष्ट मन मान्यच करत नाही असे म्हणत ते त्रिवार नतमस्तक झाले. यावेळी त्यांच्या सोबत बीड जि.प. चे गट नेते अजय मुंडे, रामेश्वर मुंडे सचिन मुंडे, अभय मुंडे, माऊली मुंडे (पोलीस पाटील) व इतर उपस्थित होते.

पंकजा मुंडेसह अनेकांनी केले अभिवादन….

शनिवारी सकाळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde), खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी आपल्या कुटुंबासह गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) यांच्या समाधीस्थळाचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले. अमर रहे अमर रहे गोपीनाथराव मुंडे अमर रहे पंकजाताई मुंडे आगे बढो हम तुम्हारे साथ है, कोण आली रे कोण आली महाराष्ट्राची वाघीण आली. अशा घोषणा यावेळी गोपीनाथ गडावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी अमित पालवे, गौरव खाडे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे आमदार मेघना बोर्डीकर, अक्षय मुंदडा यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. गोपीनाथ गडावर (Gopinath Gad) दर्शनासाठी गर्दी झाली होती. गोपीनाथ गडावर शुक्रवारी रात्री विद्युत रोषणाई करण्यात आली.

Exit mobile version