किल्लेधारूर दि.१२(वार्ताहर) जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आज दुपारी न्यायालयीन कामानिमित्त धारुरात येत असून एका कार्यक्रमात खाजगी एटीएमचे उदघाटन त्यांचे हस्ते होणार आहे.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची मंत्री व पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच धारुर शहरात येत आहेत. येथील न्यायालयात एका जून्या न्यायप्रविष्ठ प्रकरणी ते दुपारी २ वाजता उपस्थित राहणार आहे. न्यायालयीन कामानंतर ते माजलगाव रस्त्यावरील स्टेट बँक आफ इंडिया शाखेजवळ एका खाजगी एटीएमचे उदघाटन करणार आहेत.