BEED24

धारुरमध्ये हल्लाबोल….. पहा अनोखी दिवाळी

किल्लेधारूर दि.१४(वार्ताहर) ऐतिहासिक किल्लेधारूर Dharur नगरीत आजही अनेक सण उत्सव आपल्या वेगळ्या अंदाजमध्ये साजरी होतात. आज दिवाळीचे Diwali लक्ष्मीपुजन दिवशी येथील हिंदी भाषिक समाजात हलीया बलीया हे युध्द खेळून दिवाळी Diwali साजरी होते.

शहरात Dharur कटघरपुरा भागात हिंदी भाषिक समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. यात क्षत्रिय राजपुत व कान्यकुब्ज ब्राह्मण समाजाचा समावेश आहे. या समाजाकडून शहरात पारंपारिक सण उत्सव वेगवेगळ्या रितीरिवाजाप्रमाणे प्रतिवर्षी साजरी केली जातात. सध्या सर्वत्र दिवाळी Diwali साजरी होत आहे. आज लक्ष्मीपुजन देखील युध्द अभ्यासाचा थेट प्रसंग हलीया बलीया च्या रुपात साजरा होतो. कटघरपुरा भागातील दोन वेगवेगळ्या गटात सदरील युध्द होते. यात बाणांचा वर्षाव एमेकावर करण्यात येवून जय पराजय केला जातो. पारावर एकत्रित येवून युवकांचे दोन गट हनुमान नमन करत ज्येष्ठांचे आशिर्वाद घेवून घोषणाबाजी करत मैदानावर जातात. शेवटी विजयी व पराजित गट येथील बालाजी मंदिरात एकत्र जमुन एकमेकास आलिंगन देवून दिपावलीच्या शुभेच्छा देतात. घरात लक्ष्मीपुजन करुन संध्याकाळी हे युध्द होते. अनेक भागात हल्ला बोल पहावयास मिळते. तसाच थरारक युध्द प्रसंग पहाण्यासाठी लोक जमा होतात.

Exit mobile version