BEED24

Hit and run … अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला जागीच ठार.

बीड दि.5 मार्च – Hit and run … आज दि. 05 मंगळवार रोजी पहाटे 6 वाजता मांजरसुंबा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. नाशिकला जाणाऱ्या आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी आलेल्या निर्मला दर्यापूरकर (वय 56) यांचा रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या वणी जि. यवतमाळ येथील रहिवासी होत्या. त्या हल्ली पोहीचा देव मांजरसुंबा येथे राहत होत्या.

 

Exit mobile version