BEED24

कोरोनाचा धोका अजून किती दिवस? जागतिक आरोग्य संघटनेचा खुलासा.

मुंबई दि.15 सप्टेंबर –  जगातील अनेक देशांसह भारताला देखील कोरोना व्हायरसचा (Corona virus) मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. दरम्यान सध्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये आता भारतात घट होताना दिसत आहे. मात्र अजूनही या व्हायरसचा धोका टळलेला नाही. कोरोनाचा धोका अजून किती दिवस असणार याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठी गोष्ट सांगितली आहे.

(How many more days of corona danger? World Health Organization disclosure.)

WHO ने वाढवली चिंता
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहिती काहीशी निराशाजनक आहे. डब्ल्यूएचओने असं म्हटले आहे की, कोरोनाला सध्या महामारीच्या श्रेणीत ठेवलं जाईल कारण व्हायरस कुठेही जाणार नाही. या निवेदनातून हे स्पष्ट झालं आहे की, सध्या जगाला निर्बंधांच्या (restrictions) छायेखाली राहणं आवश्यक आहे. कारण संसर्ग (infection) आणि त्याचे नवीन प्रकार (New variant) जोखीम वाढवत असल्याचं दिसून येतय.

डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की, जेव्हा जगभरातील अधिकाधिक लोकांना लस मिळेल आणि हर्ड इम्युनिटी (Heard immunity) मोठ्या प्रमाणावर विकसित होईल, तेव्हा कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या आपोआप कमी होईल. त्याचप्रमाणे लागण झालेल्या लोकांची संख्या देखील कमी होऊ लागेल. अशा परिस्थितीत आल्यानंतर कोरोनाला साथीच्या श्रेणीतून काढून टाकलं जाईल.

लहान मुलांना कधी मिळणार वॅक्सिन?
कोरोना रोखण्यासाठी भारतात लसीकरण (vacccination) मोहीम अतिशय वेगाने सुरू आहे आणि देशातील 75 कोटीहून अधिक लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. यासोबतच देशातील मुलांच्या लसीकरणाची तयारीही सुरू आहे आणि महिन्याच्या अखेरीस मुलांची लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

Zydus Cadila’s ची झायकोव्ह डीला देशात लहान मुलांच्या लसीसाठी मान्यता देण्यात आली आहे. ते सप्टेंबरच्या अखेरीस मुलांना लसीकरण करू शकतात. जर असं झालं, तर अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा नंतर भारत मुलांना लस देणारा चौथा देश असेल.

Exit mobile version