BEED24

कामगारांच्या मासेमारीच्या हव्यासापोटी शेकडो मासे मृत्यूमुखी….ऐतिहासिक खारी दिंडीतील प्रकार

किल्लेधारूर दि.२१(वार्ताहर) शहरातील ऐतिहासिक किल्ल्यातील Kille Dharur खारी दिंडीतील शेकडो मासे पाण्यात आज मृत अवस्थेत आढळून आली असुन पाण्यात जंतूनाशक दृव्य टाकल्यामुळे सदरील प्रकार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत आहे. याबाबत माहिती घेतली असता काल दि.२० शुक्रवार रोजी किल्ल्यात Kille Dharur कामासाठी आलेल्या कामगारांनी मासेमारीसाठी पाण्यात दृव्य टाकून मासेमारी केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कामगारांच्या मासेमारीच्या हव्यासापोटी मात्र शेकडो मासे पाण्यामध्ये मृत अवस्थेत आढळून आली असुन हजारो जीवंत मासे अंतिम घटका मोजत पाण्यावर तरंगत असल्याचे दिसत आहेत. सदरील प्रकार पाहण्यासाठी परिसरातील लोक खारी दिंडीकडे गर्दी करत आहेत.

Exit mobile version