BEED24

दुसरी लाट थोपवण्यासाठी जिल्हाधिकारी रेखावार यांचे महत्त्वाचे आवाहन

बीड दि.२ (जिमाका):- कोरोना Corona विषाणूचा संसर्गाची दुसरी लाट थोपवण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने विविध उपाययोजना लागू केल्या आहेत. नागरिकांच्या सुविधांसाठी अनेक व्यवसाय, संस्था, कार्यालये, उद्योग, व्यापार आदींना अटी-शर्ती सह परवानगी दिली आहे, महत्त्वाचे कामासाठी घराबाहेर पडायचे असेल तर संबंधितांनी यावेळी कोरोना Corona पासून बचाव होण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार Rahul Rekhawar यांनी केले आहे. सध्या सणांच्या निमित्ताने बाजार तसेच खरेदीसाठी गर्दी होत असल्यामुळे आणि बर्‍याच ठिकाणी प्रतिबंधात्मक निर्देशांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आल्यानंतर जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सदर आवाहन केले आहे.

घराबाहेर पडल्यानंतर नागरिकांनी प्रवास, खरेदी आणि कामा दरम्यान मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखणे, वेळोवेळी सॅनिटाइजर ने अथवा साबणाने हात स्वच्छ धुवावे तसेच विविध नियमांचे व निर्देशांचे पालन करून स्वतःचा आणि कुटुंबातील सदस्यांचा बचाव करावा. राज्य शासनाने “माझे कुटूंब -माझी जबाबदारी” अभियान राबविले असून दुसरी लाट थोपवण्यासाठी व संसर्ग कमी होण्यासाठी आपणच आपली काळजी घेणे खूप गरजेचे आहे. प्रशासन तर कार्यवाही करत आहे पण नागरिकांनी देखील नियम पालन केले तर कोरोनाचा संकटापासून बचाव करण्यामध्ये आपण नक्कीच यशस्वी होऊ असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार Rahul Rekhawar यांनी सांगितले आहे.

Exit mobile version