BEED24

असोल्यात आई, मुलगा पाण्यात वाहून गेले; शोधकार्य रात्रभर सुरू… एका दहा वर्षाच्या बालकाचे निधन.

औंढा नागनाथ/मुखेड दि.12 जुलै – औंढा तालूक्यातील कोंडसी (असोला) येथील ओढ्यातील पाण्याचा अंदाज चालकाला न आल्याने आई व मुलगा पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान घडली. तर मुखेड तालुक्यात कापरवाडी येथे एका दहा वर्षाच्या बालकाचे पुरात वाहून (swept away) गेल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली.

(In Asola, mother and son were swept away in the water; Search continues overnight … Ten year old dies.)

औंढा नागनाथ तालुक्यातील शेळके (पोटा ) येथे रामदास शेळके, वर्षा योगेश पडोळ, योगेश पडोळ व मुलगा श्रेयश योगेश पडोळ हे चार जण कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रम आटोपून ते कोंडसी (असोला ) मार्गे औरंगाबादला निघाले. यावेळी चालकाला (योगेशला) ओढ्याला आलेल्या पाण्याचा अंदाज आला नाही. या दरम्यान वर्षा पडोळ, श्रेयश पडोळ हा सात वर्षाचा मुलगा पाण्यात वाहून गेले. रामदास शेळके चालक योगेश यातून बाहेर आले.

दरम्यान, तहसीलदार कृष्णा कानगुले, सहायक पोलीस (Police) निरीक्षक गजानन मोरे वाहून गेलेल्या आई आणि सात वर्षाच्या मुलाचा शोध घेत आहेत रात्री उशीरापर्यत हे शोधकार्य सुरूच होते.

आजोळी आलेला दहा वर्षाचा मुलगा पुरात वाहून गेला.
मुखेड – मुखेड पासून जवळच असलेल्या कापरवाडी येथे रविवारी दुपारी झालेल्या पावसामुळे
आजोळी आलेल्या एका दहा वर्षीय मुलाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यु झाला.

डोनगाव ता.औराद जि.बिदर येथील साईनाथ प्रमोद लांडगे वय 10 वर्ष हा शाळा बंद असल्यामुळे मागील एक महिन्यापासुन आपल्या आजोळी आई सह मुखेड तालुक्यातील कापरवाडी येथे रहात होता. दि.11 जुलै रोजी मामाच्या शेतात आजी, मामी व इतर मुलांसोबत शेतात गेला. दुपारी पावसाची मोठी सुरुवात झाली आणि बराच वेळ थांबुनही पाऊस थांबेना तेव्हा 4 वाजताच्या सुमारास पाऊस कमी होताच सर्वजन घराकडे निघाले.

कापरवाडी गावाच्या उत्तरेस असलेल्या कालव्यास पाणी वाहत होते. तेव्हा मामीने दोघा मुलांना हाताला धरुन मार्ग काढत असता अचानक मामीचा पाय घसरुन पडताच. हातात पकडलेले दोघेही सुटले. वरच्या बाजूचा मुलगा मामीस अडकला पण खालच्या बाजूस असलेला साईनाथ मात्र लाटेने दुर लोटला गेला. नाल्याच्या पाण्याला ओढा जास्त असल्यामुळे वेगाने वाहत गेला. सोबत असणाऱ्या लोकांनी खुप आरडा ओरडा करूनही उपयोग झाला नाही.

तेव्हा तो सरळ वाहत गेला आणि पुढे दोन कि.मी. अंतरावर बोमनाळी जवळील नदीत सापडला. व्यंकटराव लोहबंदे यांनी घटनेची माहिती खालिल भागातील असलेल्या बोमनाळी येथील माजी पंचायत समिती सदस्य राजु घोडके यांना सांगताच जनार्दन वडजे, विजय आरबाड या सह गावातील काही तरूण नदीवर धावले बोमनाळी जवळील नदीच्या पुलाजवळ थांबले आणि साईनाथ वाहत येताच उड्या मारून बाहेर काढले. यांना मिलिंद लोहबंदे, प्रभाकर कागदेवाड, यांनी मदत केली. पण साईनाथ दोन किलोमीटर वाहत आल्याने त्याचे निधन झाले होते.

घटना पोलिसात (Police) कळताच पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, पोलिस उपनिरिक्षक कुंभारे, नायब तहसीलदार महेश हांडे, ग्रामसेवक नजिर, पोलिस काॅ.पांडुरंग पालेकर, शिवाजी आडबे, यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे शवविच्छेदन डाॅ. बालाजी गरुडकर व डाॅ.गोपाळ शिंदे यांनी केले असुन मुखेड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Exit mobile version