BEED24

मराठवाड्यात पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचा आ. सतिश चव्हाण यांना पाठिंबा

औरंगाबाद  दि.३०(प्रतिनिधी) सतत वीस वर्षे संघर्ष करुन तसेच शासन निर्णय होऊनही हताश झालेल्या पदवीधर (Graduate) अंशकालीन कर्मचाऱ्यांनी  पदवीधर निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला होता. परंतू औरंगाबाद येथे अंशकालीन कर्मचारी प्रश्नासंदर्भात आ. सतिश चव्हाण (Satish Chavan) यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर व त्यांनी आश्वासित केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष रेखाताई व राज्य संघटनेच्या निर्देशानुसार मराठवाडा विभागात आ. सतिष चव्हाण (Satish Chavan) यांना आपला पाठिंबा जाहिर केला आहे.

शासनाने राज्यात पदवीधर (Graduate) अंशकालीन उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नौकरीची संधी उपलब्ध करून देणे संबधी शासन निर्णय पारित करून सुध्दा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अंमलबजावणी होण्यास मागील दीड वर्ष लोटूनसुध्दा अद्याप पदवीधरांचा पदरात निराशाच मिळाली. या सर्व बाबींचा विचार करता राज्य संघटनेच्या अध्यक्षा रेखाताई आहेरराव यांनी राज्य संघटना तसेच सर्व जिल्हाध्यक्षां सोबत चर्चा करून पदवीधर निवडणूक २०२० (Graduate constituency election 2020) वर बहिष्कार टाकण्याच्या निर्णय जाहिर केला. त्या अनुषंगाने मराठवाडा विभागाने आपला बहिष्कार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सादर करून मराठवाडयातील लोकप्रतिनिधिंना देखील प्रती सादर केल्या. औरंगाबाद (Aurangabad) जिल्हाध्यक्ष उत्तम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष कैलास पाटील तसेच जालना औरंगाबाद (Aurangabad) विधान परिषद सदस्य तथा जिल्हाप्रमुख जालना जिल्हा अंबादास दानवे यांना निवेदने सादर केली असता त्यांनी अंशकालीन प्रश्नासंदर्भात चर्चा करून औरंगाबाद येथे परत चर्चेसाठी बोलावून सतिश  चव्हाण (Satish chavan) यांची भेट करून देऊन सविस्तर चर्चा करुन आश्वासित केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष रेखाताई व राज्य संघटनेच्या निर्देशानुसार मराठवाडा विभागात औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे (Graduate constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार आ. सतिश  चव्हाण यांना आपला पाठिंबा जाहिर केला आहे. या निर्णयाचे पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना मराठवाडा विभाग सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश सचिव मिलींद भोले, उत्तम शिंदे, रमेश गायकवाड, भैरू खांडेकर, नंदु बोडके, शे. पाशा, प्रितम पुंडगे, बंडू कदम यांनी स्वागत केले आहे.

Exit mobile version