BEED24

फेसबुक वापरणाऱ्या मुलीसोबत घडली अत्याचाराची घटना; बीडमधील प्रकार.

बीड दि.29 मे – बीड जिल्ह्यात सोशल माध्यमाचा (Social Media) आणखी एक बळी गेल्याची घटना घडली. फेसबुक (Facebook) वापरणाऱ्या एका मुलीसोबत एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. फेसबुक मैत्रीतून 16 वर्षीय तरुणीला पळवून नेवून बलात्कार करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बीड (Beed) जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीची फेसबुकवरुन एका तरुणाशी मैत्री (Friendship on Facebook) झाली. हा तरुण कोल्हापूर (Kolhapur) येथील रहिवासी आहे. या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर ही मुलगी फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी थेट कोल्हापुरला गेली. तेव्हा तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. या फेसबुक फ्रेंडने तिच्यावर अत्याचार ( Physcial Abused ) केला.

याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरुन अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पीडित मुलगी आणि मुलगा हे दोन्ही कोल्हापुरात सापडले, अशी माहिती बीड पोलिसांना मिळाल्यावर पोलीस पथक दि. 27 मे रोजी कोल्हापूर येथे गेले. यांनतर त्या दोघांना दि. 28 मे रोजी पोलिसांकडून बीड येथे आणण्यात आले.

यानंतर अपरहणाच्या गुन्ह्यात पोलिसांनी बलात्कार (Rape) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक (POCSO) कलम वाढविले आहे. आरोपी तरुणाचे नाव समद महंमद तहसीलदार असे आहे. त्याचे वय 19 असून तो कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याच्या खेबळी येथील रहिवासी आहे. बीड येथील ग्रामीण पोलिस ठाणे परिसरात राहणारी एक 16 वर्षीय मुलीची वर्षभरापूर्वी समद तहसीलदार नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती.

यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमात ही मुलगी इतकी वाहत गेली की ती दि. 24 मेला घरातील कुणालाही न सांगता बीड येथून कोल्हापुरला (Kolhapur) गेली.  कोल्हापुरला गेल्यावर आग्रा येथे दि. 25 मेला एका बंद स्थितीतील विश्रामगृहात या दोन्ही प्रेमीयुगुलाने मुक्काम केला. याचवेळी या अल्पवयीन मुलीवर आरोपी समदने अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी दि.26 तारखेला या दोघांना स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अधिक तपास पिंक मोबाईल पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे करत आहेत.

( Incident of harassment with a girl using Facebook; Types in Beed. )

Exit mobile version