BEED24

बीड जिल्ह्यात आज कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ ; कोरोनासह स्वाईन फ्ल्यूचे संकट.

बीड दि.26 जुलै – बीड जिल्ह्यात आज कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ आढळून आली आहे. बीड जिल्ह्यात कोरोनासह स्वाईन फ्ल्यूचे दुहेरी संकट दिसून येत आहे. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 575 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 24 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 554 जण निगेटिव्ह आहेत.

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-10, अंबाजोगाई-0, आष्टी-3, धारुर-0, गेवराई-3, केज-0, माजलगाव-2, परळी-2, पाटोदा-1, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या मंगळवारच्या नोंदीनूसार 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2877 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 47 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 2.88 टक्के, रिकव्हरी रेट 97.31 तर डेथ रेट 2.64 आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत 9 स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळले असून जिल्ह्यावर दुहेरी संकट ओढावले आहे.
( Increase in the number of corona patients in Beed district today; Swine flu crisis with corona. )

Exit mobile version