BEED24

ज्येष्ठ मंत्र्यांना अधिवेशनात कोरोनाची लागण… त्याच मंत्र्यावर गुन्हा नोंदवण्याचे निर्देश

मुंबई – दि.6 मार्च- अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी (budget session) आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यातच आता मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाल्याने विधिमंडळात खळबळ उडाली आहे. यातच विजय वडेट्टीवार यांच्यासह 12 व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात यावा, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आला आहे. याबाबत न्यायालयाने संबंधिताना नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

(Infection of corona in the convention of senior ministers … Instructions to register a crime against the same minister)

राज्यात कोरोना (corona) रुग्णांची संख्या वाढत असताना गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यातच काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांना कोरोना झाल्याची माहिती वडेट्टीवारांनी ट्विटरवरून दिली आहे. यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (budget session) निमित्ताने मुंबई येथे असून आज कोरोनाचे लक्षण दिसल्याने मी कोविडची चाचणी केली, या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत आहे, लवकरच आपल्या सेवेत पुन्हा रुजू होईल असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच मागील 2 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांनी, नागरिकांनी काळजी घ्यावी असंही त्यांनी सांगितले आहे.

मुंबईत सुरु असलेल्या अधिवेशनात विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते, या अधिवेशनात विधानभवन परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सर्व आमदार व अधिकारी उपस्थित असतात, त्यामुळे आता वडेट्टीवारांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच कोरोनाची (corona) चाचणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनासाठी ठाकरे सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे.

वडेट्टीवार यांच्यासह 12 व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याबाबत न्यायालयाचे निर्देश.
नेहा मितेश भांगडिया व इतर सहा जणांना गडचिरोली येथील सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण मंडळाच्या विश्वस्तपदावरून कमी करण्यासाठी खोटे राजीनामे व प्रतिज्ञापत्रे तयार केल्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Vadettiwar) यांच्यासह 12 व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात यावा, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यात न्यायालयाने शुक्रवारी नागपूर पोलीस आयुक्त, गडचिरोली पोलीस अधीक्षक, गडचिरोली पोलीस निरीक्षक आणि वडेट्टीवार यांच्यासह संबंधित 12 व्यक्तींना नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

Exit mobile version