माजलगाव दि.29 एप्रिल – नगरपालिकेकडून परिसर स्वच्छ करताना जेसीबीमुळे (JCB) भिंत पडल्याने आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना माजलगावमध्ये दि.28 गुरुवारी घडली. याप्रकरणी माजलगाव (Majalgoan) नगर पालिकेचे मुख्याधिकारी (Chief Officer of the Municipality) विशाल भोसले यांच्यावरा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुरुवार दि. 28 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान सदर घटना घडली. विशेष म्हणजे ईदगाह परिसरात घाण नसताना देखील जेसीबी का पाठवण्यात आली याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर संतप्त नागरिक व नातेवाईकांनी मुख्याधिकारी भोसलेच यास जबाबदार असल्याचा आरोप करीत गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलीस स्टेशन (Police Station) समोर सुमारे दोन तास ठिया दिल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील जुना ईदगाह परिसर शहराच्या मधोमध आहे तसेच या ठिकाणी एक मोठी मस्जिद देखील आहे. या परिसरात कसल्याच प्रकारची घाण नसताना व जेसीबी सारखे अजस्त्र यंत्र आत मध्ये जात नसताना ही जबरदस्तीने जेसीबी आत मध्ये घालण्यात आली. सदरील जेसीबी मस्जिद समोरील भागात असलेल्या भिंतीजवळ गेली असता त्या ठिकाणची भिंत ऑपरेटर च्या निष्काळजीपणामुळे पडली. ही भिंत पडली तेव्हा त्या रस्त्यावरून सय्यद इकरा सय्यद निसार (वय 8) ही मुलगी व तिच्यासोबत इतर तीन मुले जात असताना इकरा हिच्या अंगावर भिंत पडली.
त्यात ती जागीच दबली इतर मुले मात्र पळून गेली ही बाब जेसीबी चालकाच्या लक्षात देखील आली नाही. त्याने जेसीबीचे खोऱ्याने पडलेली भिंत अलीकडे घेत असताना सदरील खोरे हे मुलीला लागण्याने तिचा चेंदामेंदा झाला. याचवेळी खोऱ्या बरोबरच मुलगी वर उचलल्या गेल्याने ही बाब लक्षात येताच सदरील जेसीबी चालक पळाला. तो का पळत आहे हे पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना सदरील मुलगी मयत झाल्याचे दिसून आले. यानंतर संतप्त जमावाने जेसीबीच्या काचा फोडत चांगलाच धिंगाणा घातला.
यानंतर जेसीबी चालका सह मालक व मुख्याधिकारी (Chief Officer of the Municipality) यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून नागरिक व नातेवाईकांनी येथील शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने परिसरातील वातावरण तब्बल दोन ते तीन तास तणावपूर्ण झाले होते. यातील मयत इकरा ही येथील बुखारी उर्दू शाळेत इयत्ता 3 री च्या वर्गात शिकत होती. तीचा अत्यंत मनमिळाऊ स्वभाव होता. तर ऐन शबे कद्र असल्याने मुस्लिम समाजातील बालकांत इदचा वेगळाच आनंद असताना तिच्या मृत्यूने परिसरात दुखाची छाया पसरली होती. सर्वत्र या घटनेने हळहळ व्यक्त होत होती.
घटनेतील जेसीबी मुख्याधिकारी भोसले यांच्या नातेवाईकाचा.
सदरील जेसीबी ही येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या भावाची असल्याचे याठिकाणी बोलले जात होते. तसेच भोसले हेच इतरांच्या नावाने स्वच्छतेचे टेंडर चालवत असल्याचा देखील आरोप उपस्थित नागरिकांकडून होत होता. तर शहरात जिओ लाईन ओढण्यासाठी स्वतः रस्ते खोदण्याचे कामे करत असल्याची चर्चा होती.
( JCB kills eight-year-old girl after falling off wall; Crime recorded against Chief Officer Vishal Bhosale. )