बीड दि.16 एप्रिल – राज्यात एकीकडे कोरोनाचा कहर माज असताना दुसरीकडे कोरोना लस आणि ऑक्सिजनवरुन मोठ्या प्रमाणात राजकारण तापलं आहे. बीडमध्ये कोरोना लसीचा (Corona Vaccine) तुटवडा जाणवत आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहीत आहे, असे ट्वीट पंकजा मुंडेंनी केले होते. या ट्वीटवरुन त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या या ट्वीटवर (Twitter) सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ट्वीटरवरुन जोरदार टीका केली आहे.
(Kalgitura between Dhananjay Munde and Pankaja Munde in the district; Twitter war over corona vaccine shortage …)
धनंजय मुंडे यांचे सलग सहा ट्वीट
‘अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत. त्यामुळे शिल्लक लसींची (Corona Vaccine) माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या. हे काहींना ज्ञात नसेल,’ अशी टीका धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यात सध्या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनचे 13290 डोस शिल्लक आहेत. तसेच हा स्टॉक संपायच्या आत आणखी दोन दिवसांनी पुढील स्टॉक येईलच, हेही काहींना माहीत नसावं. पण आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! असेही ट्वीट धनंजय मुंडेंनी केले आहे.
जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून 149473 नागरीकांना पहिले तर 19732 नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत.हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा,पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको.
काय होतं पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच ट्विट..
बीड जिल्हयात कोरोनाची स्थिती गंभीर बनली असताना रेमडेसिवीर आणि कोरोना लसींचा मोठया प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. अशातच राज्य सरकारने बीडला केवळ २० डोस दिले आहेत, यासंदर्भात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) पत्र पाठवून खेद व्यक्त केला होता. दरम्यान, बीडमध्ये सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचं हित माहित आहे, जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत असेही त्यांनी म्हटले होतं.
लसीचे केवळ २० डोस ; पालकमंत्र्यांचं लक्ष कुठयं ?
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आलेल्या २ लाख डोसेस पैकी बीडला इतर जिल्हयाच्या तुलनेत केवळ २० लसी मिळाल्या आहेत, ही अतिशय खेदजनक बाब असून पालकमंत्र्यांचं लक्ष कुठयं? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे. याकडे आपण गांभिर्याने लक्ष घालून पुरेसे डोसेस आणि इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.
बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत,’ असे ट्वीट पंकजा मुंडेंनी केले होते. या ट्वीटवरुन त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.