BEED24

आज रविवारी महिलेवर बिबट्याचा हल्ला…. पारगाव बोराडे वस्तीवरील प्रकार

आष्टीः दि.२९- आत्ताच आलेल्या वृत्तानुसार सकाळी अकरा वाजता आष्टी (Ashti) तालुक्यातील पारगाव बोराडे येथे एका महिलेवर बिबट्याने (Leopard) हल्ला केला असून या हल्ल्यात महिला गंभीर जखमी आहे. सदरील महिला भाजी आणण्यासाठी शेतात गेली असता बिबट्याने (Leopard) हल्ला केला. शालनबाई शहाजी भोसले असे जखमी महिलेचे नाव आहे. जखमीस आष्टीच्या (Ashti) उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या नरडीवर जखम झाली असून बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे.

Exit mobile version