BEED24

बिबट्याचा आणखी एकावर हल्ला…ना.धनंजय मुंडे आष्टीच्या दौऱ्यावर

बीडः दि.२८(प्रतिनिधी) आष्टी (Ashti) तालुक्यात बिबट्याचा (Leopard) थरार सुरुच असून काल बालकाचा जीव घेतल्यानंतर एका वन कर्मचाऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. बीड (Beed) जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे आज (दि.२८) आष्टी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. ना. मुंडे तालुक्यात दोन ठिकाणी बिबट्याच्या (Leopard) हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या दोन्ही पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.

आष्टी (Ashti) तालुक्यातील सुरडी येथील नागनाथ गर्जे या शेतकऱ्याचा चार दिवसांपूर्वी तर कालच्या घटनेत किन्ही येथील एका नऊ वर्षांच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या नरभक्षक बिबट्यास (Leopard) पकडण्यासाठी किन्ही परिसरात कर्तव्यावर असलेल्या वन कर्मचारी बबन गुंजाळ यांच्यावरही या बिबट्याने हल्ला केला. मात्र सतर्क असलेल्या गुंजाळ यांनी प्रसंगावधान राखत हातातील काठीने बिबट्याचा हल्ला परतवून लावला. सुदैवाने गुंजाळ यांना कसलीही दुखापत झाली नसून बिबट्या शेतात पसार झाला. आज शनिवारी पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आष्टी (Ashti) तालुक्याचा दौरा करत आहेत. या दौऱ्यात दोन्ही पीडित कुटुंबांची ना. मुंडे भेट घेणार आहेत. तसेच या भागात दहशत पसरवलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरुरसह गेवराई तालुक्यात सध्या बिबट्याची दहशत आहे.

Exit mobile version