BEED24

Leopard in Dharur धारुर शहरानजीक पुन्हा बिबट्याची दहशत.

किल्लेधारुर दि.28 अॉगस्ट – Leopard in Dharur धारुर वनपरिक्षेत्रात forest दोन वर्षांपुर्वीच मृत बिबट्या आढळून आला होता. यानंतर पुन्हा एकदा बुधवारी दि.27 रोजी धारुर शहराजवळच्या डोंगरात बांगरवाडी परिसरात बिबट leopard दिसून आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धारुर Dharur वनपरिक्षेत्र परिमंडळात forest office धारुरसह केज, माजलगाव व वडवणी Wadvani तालुक्याचा मोठा भाग समाविष्ट आहे. या वनपरिक्षेत्रात अनेक वन्यजीव आढळून येतात. दोन वर्षांपूर्वी धारुरपासून जवळच असलेल्या वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथे ऊसाच्या शेतात मृत बिबट्या leopard आढळला होता. यानंतर याच परिसरातील सोन्नाखोटा ता. वडवणी Wadvani जगन्नाथ लोंढे यांच्या शेतात दोन बिबट दिसून आले होते. सध्या सणासुदीचे दिवस सुरु असून यातचत सोशल social media माध्यमातून धारुर शहरानजीकच्या सारुकवाडी व बांगरवाडी परिसरातील डोंगरात बिबट्या दिसुन आल्याचे व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे परिसरात दहशत माजली आहे. याबाबत धारुरचे वन विभागाशी संपर्क केला कर्मचारी संभाजी पारवे यांनी परिसरात जावून पाहणी करणार असल्याचे सांगत लोकांना घाबरून न जाता कोठ्याजवळ वीजेचा प्रकाश करुन पाळीव प्राण्यांना सुरक्षित स्थळी बांधून ठेवण्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

Exit mobile version