BEED24

Leopard terror.. धारुर तालुक्यात पुन्हा बिबट्याची दहशत….

किल्लेधारुर दि.1 फेब्रुवारी – Leopard terror… धारुर Dharur तालुक्यातील धुनकवाड येथे बिबट्याची दहशत असून येथील शेतकरी विक्रम प्रल्हाद यादव यांच्या रिटा नावाच्या शेतात बुधवारी रात्री गायीच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून या वासराचा फडशा पाडला. सदरील घटनेचा वनपाल दिनेश मोरे व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला असून सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या भागात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा आहे. याआधीही पहाडी दहिफळ व धारुर Dharur शहराच्या परिसरात शेळ्या व वासराचा फडशा पाडल्याच्या घटना घडल्या. धुनकवाड परिसरात ही दुसरी घटना घडली आहे. परंतू वनविभाग यावर काहीच उपाययोजना करताना दिसत नाही. मनुष्यहानी झाल्यावर उपाययोजना करणार का असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या नजरेस बिबट्या पडल्याने त्याची भीती शेतकऱ्यांत वाढली. धारुर तालुक्यातील पहाडी दहिफळ, धुनकवाड व पहाडी पारगाव शिवारात कुंडलीका धरणामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. येथे लपण्यासाठी बिबट्याच्या आवडीचे क्षेत्र निर्माण झाल्याने येथे काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. सध्या ऊसतोडणी मजूर ऊसतोड करत असल्याने या ऊसतोड मजुरातही प्रचंड भिती निर्माण झाली आहे. वनविभागाने येथे पिंजरा व कॅमेरे लावुन हा बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी शेतकऱ्यांतुन होत आहे. याबाबत वनपाल मोरे यांनी ग्रामस्थांना सुरक्षितता बाळगण्याबाबत सुचनां करुन काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version