BEED24

‘लव जिहाद’ कायद्याला उच्च न्यायालयाचा दणका;….

अलाहाबादः दि.१०- गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या राज्यात ‘लव जिहाद’ चा विषय नवीन विषय पुढे करुन राजकीय वातावरण तापत असताना अलाहाबाद (Allahabad) उच्च न्यायालयाने एका प्रकरणात कुठल्याही सज्ञान दाम्पत्यांला त्याच्या मर्जीप्रमाणे राहण्याचा अधिकार असल्याचा निर्णय दिला असून सदरील निर्णय हा आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाहांना पोषक समजला जात आहे. यामुळे मात्र उत्तरप्रदेश (UP) व अन्य राज्यात सुरु असलेल्या नवीन लव जिहाद कायद्याला दणका देणारा ठरला आहे.

अलाहाबाद (Allahabad) उच्च न्यायालयाने (High court) एका २२ वर्षीय महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला. संगिता हिने एका मुस्लिम तरुणाशी विवाह करुन स्वखुषीने इस्लाम धर्म स्विकारला. मात्र याप्रकरणी तिच्या कुटूंबियांकडून दोघांच्या जिवितास धोका असुन पोलिस (Police) संरक्षण मिळण्याची मागणी तिने कोर्टाकडे केली होती. याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात (High court) न्यायमुर्ती सरल श्रीवास्तव यांच्या खंडपिठाकडे सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायमुर्ती श्रीवास्तव यांनी दोघे सज्ञान असून त्यांनी स्वेच्छेने सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या सुखी आयुष्यात कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत तात्काळ पोलिस (Police) सुरक्षा पुरवण्याचा आदेश दिला. यामुळे उत्तर प्रदेश (UP) मध्ये करण्यात आलेल्या आंतरधर्मीय विवाह कायद्याला मोठा दणका बसला आहे. या कायद्याच्या विरोधात यापुर्वीच अनेक जनहित याचिका दाखल आहेत.

Exit mobile version