किल्लेधारूर दि.22 जानेवारी – शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते व माजी शहर प्रमुख दामोदर उर्फ (बंडू) रामराव शिनगारे (49 वर्ष) यांचे अल्पशा आजाराने 22 जानेवारी रोजी रविवारी दुपारी निधन झाले. त्यांचे पार्थीहा वर सांयकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.
धारूर (Dharur) शहरातील शिवसेनेचे (Shiv Sena) कट्टर समर्थक व शिवसेनेच्या अनेक पदावर कार्यरत असणारे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख दामोदर उर्फ बंडू रामराव शिनगारे (वय 49) वर्ष यांचे अल्पशः आजाराने रविवारी दुपारी लातूर (Latur) येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी धारूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या कार्यामुळे शिवसैनिकात एक नवचैतन्य निर्माण होत होते. त्यांच्या निधना मुळे अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.
(Loyal activist of Shiv Sena Damodar alias Bandu Shingare passed away.)