BEED24

महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी; पहा राज्याची परिस्थिती.

मुंबई दि.6 मे – राज्यात कोरोना संसर्गाचा (Corona Infection) आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोना बाधित (Corona Positive) रूग्ण आढळून येत असतानाच आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन (lockdown) घोषित करण्यात आला. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात (Maharashtra) होत असताना पाहायला मिळत आहे.

(Maharashtra’s worrying news; See State of the art situation.)

प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं आहे. दिवसभर लाॅकडाऊन (lockdown) असल्यामुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत परिणामी रुग्णसंख्येत घट झाल्याचं दिलासादायक चित्र समोर येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 57 हजार 640 कोरोना बाधित (Corona Positive) रूग्ण आढळले असून, तब्बल 57 हजार 006 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मृत पावणाऱ्यांच्या संख्येत मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं, काल 920 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असताना पाहायला मिळत आहे. मुंबईतुनही काही प्रमाणात धक्कादायक चित्र समोर आलं आहे. रुग्णवाढ कमी होत असताना तिकडे काल अचानक रूग्णांची वाढ होण्याचं प्रमाण वाढत आहे.

महाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना संसर्ग (Corona Infection) रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात विकेंड लाॅकडाऊन घोषित केला, त्यानंतर आता महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊन लागु करण्यात आला आहे. आता तरी लोक नियमांचं पालन करून सरकारला सहकार्य करणार का? की, नेहमीसारखं बेजबाबदार वागणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आताच्या लाॅकडाऊनमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.

संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून येत आहे. काल दिवसभरात पुण्यातुनही काही प्रमाणात दिलासादायक चित्र पाहायला मिळालं, रूग्णांचं बरे होण्याच प्रमाण तिकडे वाढत आहे. काल पुण्यात दिवसभरात 3 हजार 260 कोरोना बाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होणार की अशीच रूग्णसंख्या वाढत जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version