BEED24

लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; आयपीएस अधिकारी निसार तांबोळी यांना राष्ट्रपती पुरस्कार

मुंबई दि.14 मार्च – मुंबई क्राईम ब्रँचचे (Mumbai crime branch) आयपीएस (IPS) अधिकारी निसार तांबोळी यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहिर झाला. तांबोळी यांचे मुळगाव लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ आहे. निसार तांबोळी (Nisar Tamboli) याना उत्कृष्ट कामगिरी बद्दल भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार (President’s Award) जाहीर झाला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

(Manacha Tura in the crown of Latur; President’s Award to IPS Officer Nisar Tamboli)

निसार तांबोळी (Nisar Tamboli) हे 1996 पासून सेवेत कार्यरत असून 2006 साली ते आयपीएस (IPS) झालेले लातूर जिल्ह्यातील एकमेव अधिकारी आहेत. तांबोळी यांनी आजपर्यंत अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या असून कुठल्याही वादविवादात ना अडकलेले ते एकमेव अधिकारी आहेत. हिंगोली, नांदेड, वर्धा, नंदुरबार, अमरावती, नाशिक, मुंबई येथे त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. 2009 ते 2012 या कालावधीत मुंबई क्राईम ब्रांचमध्ये ते कार्यरत होते. 2008 ते 2009 एअरपोर्ट झोन, 2015 ते 2017 औरंगाबाद येथे SRPF येथे मुख्य अधिकारी म्हणून त्यांनी महत्वपूर्ण काम केले आहे.

त्यांना यापूर्वी SRPF औरंगाबादचा परिसर स्वच्छ ठेवल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने गौरविले आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या निसार तांबोळी याना भ्रष्टाचारमुक्त भारताची संकल्पना आवडते, स्वच्छ कारभार हा त्यांचा अजेंडा असून आजपर्यंत कसलाही डाग त्यांनी लागू दिलेला नाही. एक डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा जनमानसात आहे. मुंबई क्राईम ब्रँचसाठी (Mumbai crime branch) दुसऱ्यांदा प्रशासनाने त्यांना पाचारण केले आहे. जिथे पाठवेल तिथे जाऊन आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची त्यांची तयारी असते. त्यांना मिळालेल्या या राष्ट्रपती पुरस्कारामुळे (President’s Award) लातूर (Latur) जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Exit mobile version