BEED24

पॉझिटीव्ह रुग्णांचे मीटर सुरुच… पहा कुठले आणि किती आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.१६(वार्ताहर) येथील कोविड (covid-19) केअर सेंटर येथे करण्यात आलेल्या २० ॲन्टीजन (antigen) तपासणीत २ पॉझिटीव्ह रुग्ण तर १८ निगेटिव्ह आढळली आहेत. तर काल पाठवण्यात आलेल्या १७ स्वॅब (Swab) पैकी ६ पॉझिटीव्ह (positive) रुग्ण आढळली आहेत. सलग तिसऱ्या दिवशीही ८ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत.

कोविड सेंटरमध्ये आज २० ॲन्टीजन चाचण्या करण्यात आल्या. यापैकी केवळ २ पॉझिटीव्ह आल्या आहेत. तर काल पाठवलेल्या १७ स्वॅब (Swab) नमुन्यापैकी ६ पॉझिटीव्ह (positive) अहवाल प्राप्त झाली आहेत. आज २२ जनांचे स्वॅब (Swab) नमुने तपासणी साठी अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली. सलग तीन दिवसात शहरातील ३१ रुग्ण आढळली आहेत. शहरवासीयांसाठी हा चिंतेचा विषय असून नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.

ॲन्टीजन (antigen) तपासणीत आढळलेले रुग्ण

१. ५० वर्षीय स्त्री, कसबा, धारुर

२. ४० वर्षीय पुरुष, कटघरपुरा, धारुर

स्वॅब (Swab) नमुन्यात आढळलेले

३. १८ वर्षीय पुरुष, कसबा,धारुर

४. ३२ वर्षीय स्त्री, तेलगाव रोड,धारुर

५. १३ वर्षीय स्त्री, तेलगाव रोड,धारुर

६. ५२ वर्षीय पुरुष, सोनिमोहा, ता.धारुर

७. ४७ वर्षीय पुरुष, वडगावकर गल्ली, धारुर

८. १०२ वर्षीय स्त्री, अंजनडोह, ता.धारुर

यांचा समावेश आहे.

Exit mobile version