BEED24

धारुर तालुक्यातून विवाहीत महिला बेपत्ता; पतीने केली पोलीसात तक्रार.

किल्लेधारूर दि.23 जुन – धारुर तालुक्यातून विवाहीत महिला बेपत्ता झाली आहे. कानीफनाथ तांडा येथील विवाहित महिला कोमल अमोल राठोड हि शेतात जाते म्हणून बुधवारी गेली ती परत घरी न आल्याने ती हरवल्याची तक्रार तिच्या पतीने धारूर पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

धारूर तालूक्यातील जहागीरमोहा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कानीफनाथ तांडा येथील विवाहित महिला कोमल अमोल राठोड (वय 18 वर्ष) हि बुधवारी सकाळी शेतात कामाला जाते म्हणून गेली. ती परत घरी आलीच नाही. माहेरी हरीशचंद्र पिंप्री व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र ती कोठेच आढळून आली नाही.

दोन दिवस होवून परत आली नाही व नातेवाईकांकडेही आढळून आली नसल्यामुळे तिचा पती अमोल राठोड यांनी ती हरवल्याची तक्रार धारूर पोलीस ठाण्यात दिली आहे. सदर फोटोमधील महिलेबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहे.

( Missing married woman from Dharur taluka; The husband lodged a complaint with the police. )

Exit mobile version