धारुर शहरातून दोन लेकरांची आई बेपत्ता; पोलिसांत हरवल्याची नोंद.

किल्लेधारूर दि.14 मे – धारुर शहरातील मच्छी मार्केट परिसरात निवासी असलेली दोन लेकरांची आई 25 वर्षीय विवाहित महिला दि.8 मे पासून बेपत्ता आहे. याबाबत बेपत्ता महिलेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन धारुर पोलिसांत हरवल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील मच्छी मार्केट परिसरात राहून बांधकाम मजुरी करणाऱ्या कांताबाई भिमा केदार (वय 40) यांनी दि.11 रोजी धारुर पोलिसांत मुलगी हरवल्याची तक्रार दिली. या तक्रारीत नोंदवल्याप्रमाणे अश्विनी महादेव राख ही 25 वर्षीय विवाहित महिला दि.8 रोजी रात्री नऊ वाजता गावाकडे जाते म्हणून फिर्यादी समक्ष निघून गेली.
सदर बेपत्ता विवाहितेस एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्य आहेत. सदर विवाहित महिला हि गप्पेवाडी येथील रहिवासी असून गेल्या चार वर्षांपासुन ती आईकडेच धारुर येथे राहते असे फिर्यादीत नोंदवले आहे. दोन दिवस होवून परत न आल्यामुळे तिच्या नातेवाईकांकडून तिचा वडवणी, भायजळी, कोरेगांव, कोल्हेवाडी आदी ठिकाणी नातलगांकडे शोध घेण्यात आला.
सर्वत्र शोध घेवूनही सदर बेपत्ता महिला कोठेही आढळून आली नसल्याने दि.11 रोजी बेपत्ता महिलेच्या आईकडून धारुर पोलिसांत तक्रार नोंद करण्यात आली. यावरुन धारुर पोलिसांनी 25 वर्षीय विवाहिता हरवल्याची नोंद घेतली असून सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई अर्जून राठोड पुढील तपास करत आहेत.
( Mother of two children missing in Dharur Missing police report. )