BEED24

MPSC Result… धारूरच्या डॉ.ऋषभ पारवे याची एमपीएससीमधून श्रेणी-1 पदावर निवड.

किल्लेधारुर दि.21 अॉक्टोंबर – MPSC Result… नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत धारूर Dharur येथील वन विभागात कार्यरत असलेल्या संभाजी पारवे यांचा मुलगा डॉ. ऋषभ पारवे याचा महाराष्ट्र राज्यात सर्वद्वितीय क्रमांक आला असून त्याची पशुधन विकास अधिकारी श्रेणी-1 म्हणून निवड झाली आहे.

डॉ. ऋषभ संभाजी पारवे सध्या उत्तर प्रदेशातील बरेली येथे एम.व्ही. एससी (M.V.Sc.) ही पदव्युत्तर पदवी घेत असून गेल्या दोन महिन्यांपूर्वी एमपीएससी परीक्षा (MPSC) झाली होती. या परीक्षेत डॉ. ऋषभ पारवे अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. डॉ. ऋषभ पारवे याचे प्राथमिक शिक्षण त्याचे काका-मावशी व मुंबई मनपाचे आदर्श शिक्षक प्रभाकर हजारे यांचेकडे मुंबईत झाले. तर परभणी येथे त्याची बी. व्ही. एस. सी. ची डिग्री पूर्ण झाली. लहानपणा पासूनच अतिशय हुशार आणि संवेदनशील असल्याने त्याने अभ्यासात सातत्य ठेवले आणि यश संपादन केले. डॉ ऋषभ पारवे हा धारूर Dharur येथील सर्वांना परिचयाचे असलेल्या शंकरराव गायसमुद्रे गुरुजी यांचा नातू आहे. डॉ. ऋषभ पारवे यांच्या या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version