BEED24

मुंबई हळहळली; 7 लहान बालकांसह 11 जणांचा मृत्यू… मुख्यमंत्र्यांनी भेट देत केली मदत जाहिर.

मुंबई दि.10 जून – या वर्षातील पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडवली असून संपूर्ण मुंबई जलमय झाली आहे. त्यातच रात्री पावसामध्ये मालाड भागात एक चार मजली इमारत कोसळून (building collapsed) 7 बालकांसह 11 जण ठार झाले, तर सात जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये सहा वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या दुर्घटनेत अडीच वर्षाच्या चिमुकलीची मात्र सुटका करण्यात पथकाला यश मिळाले आहे. ‘दैव तारी त्याला कोण मारी ‘ असे या बाबतीत म्हटलं जात आहे. यात एकाच कुटूंबातील 9 सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) यांनी भेट देवून जखमींची विचारपूस केली असून मदत जाहीर केली.

(Mumbai was shaken; 11 killed, including 7 children … CM visits and announces help)

मुसळधार पावसाने पुन्हा एकदा मुंबईत संकट ओढवले असून मालाड पश्चिम भागात काल बुधवारी (दि.9) रात्री चार मजली निवासी इमारत कोसळल्याने 11 जण जागीच ठार तर अनेक जखमी झाले. दरम्यान, पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी दुर्घटना स्थळाला भेट दिली. पावसामुळे इमारती कोसळल्या (building collapsed) नंतर आता बचावकार्य सुरू आहे. तसेच जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या इमारतीखाली आणखी लोक त्याखाली अडकले आहेत का हे पाहण्यासाठी इमारतींचा मलबा काढला जात आहे.

या दुर्घटनेत महिला व बालकांसह 18 जणांना वाचविण्यात आले असून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकण्याची शक्यता असल्याने बचावासाठी अग्निशामक दल (Fire brigade) तसेच मदत आणि बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीने ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे.

रात्रीपासून सुरू झालेले अग्निशमन दलाने (Fire brigade) शोध आणि बचावकार्य अद्याप सुरू केले. नागरीक आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही इमारत एका दुमजली इमारतीत कोसळली त्यालगतची तीन मजली इमारतही अस्थिर होती, बुधवारी रात्री 11.15 वाजेच्या सुमारास मालवणी परिसरातील अब्दुल हमीद रोडच्या नवीन जिल्हाधिकारी कंपाऊंडमध्ये हा अपघात झाला.

त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी व अन्य एजन्सी तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि बचाव व शोधमोहीम सुरू केली. या अपघातात आठ मुले आणि तीन प्रौढांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आठ, नऊ आणि 13 वर्षांच्या 3 मुलांची ओळख पटली आहे. इतर आठ जण ओळखले जात आहेत. अन्य जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना ढिगाऱ्याबाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, मुंबईत बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे शहरातील काही भागात पाणी साचले आणि त्यामुळे रस्ते व रेल्वे रुळही बंद पडले. याशिवाय, ठाण्यातही भिंती कोसळण्याच्या तीन घटना घडल्या आहेत, मात्र कोणीही जखमी झाले नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले की, पालघर जिल्ह्यातील कोळगाव गावात पूल कोसळला परंतु कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुंबईत मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी असल्याने मुंबईची जीवनरेखा असणाऱ्या लोकल ट्रेनचे कामकाज विस्कळीत झाले आणि चार भुयारी मार्गही बंद करावे लागले. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या चार दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सकाळपासूनच मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भाग बुधवारी पाण्यात बुडाला.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलमधील ट्रॅक पाण्यात बुडाले. ज्यामुळे ठाणे व वाशीसाठी लोकल गाड्यांचे कामकाज ठप्प झाले. त्याचप्रमाणे बेस्ट बसेसचा मार्गदेखील बदलावा लागला. महानगरातील चार भुयारी मार्गही पाण्यामुळे कोसळल्याने बंद करावे लागले. तसेच सखल भागातील लोकांच्या घरात पाणी शिरले. हवामान खात्याच्या माहितीनुसार सांताक्रूझ येथे दुपारी अडीच वाजेपर्यंत 164 मिलीमीटर पाऊस पडला.

दरम्यान, समुद्रात 4 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळल्या. मुंबईतील जलसाठ्याच्या परिस्थितीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांनी महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण केंद्रावर जाऊन अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. ठाकरे यांनी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्हा दंडाधिकाऱ्याशीही चर्चा केली. हवामान खात्याचे (आयएडी) मुंबई कार्यालय प्रमुख डॉ. जयंत सरकार म्हणाले, मान्सून आला आहे. येत्या ४८ तासात मुंबई शहर व उपनगरामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली जखमींची विचारपूस
दरम्यान, मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्धल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला तसेच जखमी रहिवाशांची कांदिवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे जाऊन विचारपूस केली. यावेळी पालक मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thakre), पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर हे उपस्थित होते.

Exit mobile version