BEED24

झोपेत असलेल्या गवंडयाचा दगडाने ठेचून खुन…

झोपेत असलेल्या गवंडयाचा दगडाने ठेचून खुन…

आष्टी दि.१६ (प्रतिनिधी) घराचे बांधकाम करण्यासाठी आलेल्या मजुराने गुरूवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गवंडी तरूणाच्या डोक्यात पहाटेच्या गाड झोपेत असताना दगडी तोड घालुन खुन (Murder) केल्याची घटना घडली उघडकीस आली असून अंभोरा पोलिसांनी (Police) आरोपीस अटक केली आहे.

आष्टी तालुक्यातील मंगरूळ येथील कांतीलाल मारूती काकडे (वय ४०) व ईश्वर दत्तु नवसुपे (वय २७ वर्षे) हे दोघेही देविनिमगांव येथील वाळके अनारसे वस्तीवरील गोरख नारायण पाचारणे यांच्या घरांचे बांधकाम करण्यासाठी गेले होते. बुधवारी काम आटोपून मजुर आणि गवंडी कामांच्या ठिकाणीच झोपले होते. गुरूवारी पहाटेच्या सुमारास साडेसहाच्या दरम्यान मजुर असलेल्या कांतिलाल काकडे याने अचानक गवंडी ईश्वर दत्तु नवसुपे (वय २७) यांच्या डोक्यात झोपेत असताना दगडी तोड घालुन खुन (Murder) केल्याची घटना घडली. आरोपीने बांधकाम मालकाच्या एर्टीका एम एच ०२ डी जे २५७४ या क्रमांकाच्या चारचाकी गाडीवर देखील दगडफेक करून नुकसान केले. घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस (Police) निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलिस उपनिरीक्षक राहुल लोखंडे, पोलिस हवालदार राजेंद्र काकडे, पो.कॉ. चंद्रकांत काळकुटे, पो. कॉ.गंगाधर अग्रे, पो. कॉ.संतोष सोनवणे यांनी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला उपचारांसाठी अहमदनगर (Ahemadnagar) येथे हलवले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी अंभोरा पोलिस Police) ठाण्यात गोरख नारायण पाचारणे यांच्या फिर्यादी वरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे करीत आहे.

Exit mobile version