BEED24

चाकूरमध्ये तृतीयपंथी व्यक्तीचा खून…

चाकूरः दि.१३- चाकूर (Chakur) तालुक्यातील चापोली येथे अनैतिक संबधातून एका एकवीस वर्षीय तृतीयपंथी व्यक्तीची हत्या (Murder) झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी (Police) त्या तृतीयपंथीयाच्या जोडीदार असलेल्या आरोपीस अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाकूर (Chakur) तालुक्यातील चापोली जवळील लातुर-नांदेड महामार्गावरील ब्रह्मवाडी पाटी येथे तृतीयपंथी सुदर्शन विठ्ठलराव सुर्यवंशी वय २१ वर्षे रा.चक्री ता.हदगाव याची हत्या (Murder) करण्यात आली. सुर्यवंशी हा रस्त्यावरील वाहनाकडून पैसे मागून आपला उदरनिर्वाह चालवत असे. लातूर तालुक्यातील बोकनगाव तांडा येथील रहिवासी सुनिल मोतीराम राठोड याच्यासोबत त्याची ओळख होवून अनैतिक संबध सुरू झाले. शुक्रवारी सुनिल आणि सुदर्शन यांच्यात भांडण झाले. या भांडणात सुनिलने सुदर्शनला जबर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुदर्शनचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राथमिक माहितीनूसार पोलिसात (Police) आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंद झाला. याबाबत पोलीस निरिक्षक सोपान सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर स्वामी यांनी तपास सुरू केला. तपासात सुनिल राठोड याने केलेल्या जबर मारहाण करुन खुन (Murder) केल्याचे उघडकीस आले. यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलीसांनी (Police) राठोड याला अटक केली आहे.

Exit mobile version