BEED24

Murder धारुर पोलिस हद्दीत इसमाची निर्घूण हत्ता ; पंकज कुमावत घटनास्थळी.

किल्लेधारुर दि.7 जून – Murder धारुर पोलिस हद्दीत एका 58 वर्षीय इसमाची तीष्ण हत्याराने सपासप वार करुन निर्घूण हत्या करण्यात आली. सदर घटना मंगळवारी रात्री घडली असून रात्रीच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज कुमावत यांनी घटनास्थळी भेट दिली. Murder of an old man in Dharur police limits; Pankaj Kumawat at the spot.

तीन दिवसांपूर्वीच धारुर Dharur पोलिस Police हद्दीतील आडस (ता. केज) येथे पत्नीने भावाच्या मदतीने पतीचा खून Murder केल्याची घटना उघडकीस आली. यापाठोपाठ आज धारुर पोलिस हद्दीत दुसरी खूनाची घटना घडली. अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथील गिरी वस्तीवर दत्तात्रय रामभाऊ गायके (वय 58) या इसमाचीची तीष्ण हत्याराने सपासप वार करुन हत्या करण्यात आली. रात्री साडेबाराच्या सुमारास पोलिसांना Police घटनेची माहिती मिळाली. सपोनि विजय आटोळे यांनी सहकारी अधिकारी उपनिरिक्षक संतोष भालेराव यांच्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज कुमावत Pankaj Kumawat यांनी भेट देत आवश्यक त्या सुचना केल्या. आरोपी जवळच्या नात्यातील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

 

Exit mobile version