नवी दिल्ली दि.५ फेब्रुवारी- महाराष्ट्र काँग्रेसची (Congress) खळबळ उडवून देणारी नवीन कार्यकारिणी आज हाय कमांडने जाहिर केली आहे. विद्यमान कार्यकारिणीतल्या अनेक मोठ्या नावांना आणि मंत्रिपदावरच्या व्यक्तींना फाटा देत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. नाना पटोले (Nana Patole) यांना प्रदेशाध्यक्षपदी निवडीसह जम्बो कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे.
नाना पटोले (Nana Patole) यांच्या अध्यक्षपदाबरोबरच ६ नवे कार्यकारी अध्यक्ष व १० उपाध्यक्ष पक्षाने राज्यात नेमले आहेत. आज जाहिर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत विद्यमान कार्याथ्यक्ष यशोमती ठाकूर, विश्वजित कदम यांना हटवण्यात आलं आहे. याऐवजी चंद्रकांत हांडोरे व प्रणिती शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.
अशी आहे काँग्रेसची (Congress) नवी प्रदेश कार्यकारिणी
प्रदेशाध्यक्ष – नाना पटोले
कार्यकारी अध्यक्ष
१. शिवाजीराव मोघे
२. बसवराज पाटील
३. मोहम्मद अरिफ नसीम खान
४. कुणाल रोहिदास पाटील
५. चंद्रकांत हांडोरे
६. प्रणिती सुशीलकुमार शिंदे
उपाध्यक्ष
१. शिरीष मधुकरराव चौधरी
२. रमेश बागवे
३. हुसेन दलवाई
४. मोहन जोशी
५. रणजित कांबळे
६. कैलास गोरंट्याल
७. बी. जी. नगराळे
८. शरद आहेर
९. एम. एम शेख
१०. माणिक जगताप