मुंबई : बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणी आज अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) या तिघींची चौकशी करण्यात आली. श्रद्धा कपूरनंतर साराने देखील सुशांत ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली आहे.
कोणत्याही ड्रग्ज पेडरलला ओळखत नाही, असे चौकशी दरम्यान साराने एनसीबी अधिकाऱ्यांना सांगितले. फेब्रुवारी २०१८ मध्ये केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुशांतसिंह राजपूतशी जवळीक निर्माण झाली, अशी सारा अली खानने कबुली दिली. चित्रपटाच्या शूटिंगनंतर ती सुशांतच्या घरी ‘कॅपरी हाऊस’ मध्ये बर्याच वेळा सुशांतलाही भेटायची. साराने सुशांतसोबत अनेकदा लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर गेलो असल्याचेही सांगितले आहे.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज घेत होता अशी कबुली श्रद्धा कपूरने दिलीय. कधी सेटवर तर कधी व्हॅनिटी व्हॅनमध्ये सुशांत ड्रग्ज घेत होता असं श्रद्धा कपूरने एनसीबीला सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे.
दीपिकाने करिश्मासोबतचे ड्रग्ज चॅट केल्याचं एनसीबीकडे मान्य केलं आहे. २८ ऑक्टोबर २०१७ रोजी केलेल्या चॅटमध्ये दोघी ड्रग्जविषयी बोलत होत्या. स्पष्टीकरण देताना दीपिका म्हणाली की, आम्ही आमच्या वर्तुळात डूब घेतो. ही एक प्रकारची सिगारेट असते. यात बर्याच गोष्टी असतात. दीपिका म्हणाली की ‘डूब’सारखे शब्द कोड म्हणून वापरले जातात. यात तिने ड्रग्ज असतात की नाही हे मात्र स्पष्टपणे सांगितलं नाही.
दरम्यान जवळपास साडेपाच तासाच्या चौकशीनंतर दीपिकाची आजची चौकशी संपली. दीपिका दुपारी चारच्या सुमारास NCB कार्यालयातून बाहेर पडली. यानंतर संध्याकाळी 5.45 च्या सुमारास सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही चौकशी पूर्ण झाली. दोघीही NCB कार्यालयातून बाहेर पडल्या.