BEED24

आता कांडली शिवारात आढळला बिबट्या… शेतकरी भयभीत….

आखाडा बाळापूर दि.२९ (वार्ताहर) परभणी जिल्ह्यातील कांडली शिवारात आज बिबट्याचे दर्शन झाले. पुन्हा बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. वनविभागाकडून (Forest Department) परिसरात भेट दिली असून या भागात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत.

काडंली या गावात आज सकाळी देविदास नरवाडे याच्या शेतात बिबट्या (Leopard) आढळुन आला. नरवाडे यांनी याबाबत राहुल( पिटुभाऊ ) पतंगे याना माहीती दिली. पतंगे यांनी तात्काळ ही बाब वनविभागाला कळविले. त्यानंतर वनपरिमंडळ अधिकारी प्रीया साळवे यांनी परिसरास भेट दिली. ग्रामस्थ व वनविभागाचे (Forest Department) पथक सर्व परिसर पिंजुन काढत असतांना सोपानराव देशमुख यांच्या शेतात पाण्याच्या विहिर परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे उमटलेले दिसले. परिसरातील रात्री अप रात्री पाणी देण्यास जाणाऱ्या शेतकऱ्यांत यामुळे भितीचे वातावरण तयार झाले आहे. पुन्हा एकदा बिबट्याचा (Leopard) वावर परिसरात आढळल्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.

Exit mobile version