BEED24

आता थेट लसीकरण; केंद्राने जारी केले नवे नियम.

नवी दिल्ली दि.25 मे – कोविन अॅपवर नाव नोंदणी करून अपॉईंटमेट घेण्याच्या कटकटीतून आता सुटका होणार आहे. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणी करण्याची गरज नाही. थेट लसीकरण केंद्रावर जाऊन या गटातील व्यक्तिंना लस घेता येणार आहे. याबाबत केंद्र सरकारने नवे नियम जारी केले असून त्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

(Now live vaccination; New rules issued by the Center.)

लस घेण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील व्यक्तिंना केवळ ऑनसाईट रजिस्ट्रेशन (On-Site Registration) करावं लागणार आहे. आता 18 ते 44 वयोगटातील व्यक्ती थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस (Vaccine) घेऊ शकतात. त्यांना Cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.

रोज लस (Vaccine) देण्याची वेळ संपेल आणि शेवटी ज्या लस उपलब्ध राहतील त्या ऑनसाईट व्यवस्थेनुसार (On-Site Registration) लोकांना दिल्या जातील. त्यामुळे लस वाया जाणार नाहीत. त्याचा उल्लेख कोविन प्लॅटफॉर्मवर केला जाणार आहे. ही नवीन सुविधा केवळ व्हॅक्सिनेशन सेंटरवरच असेल. अनेकदा व्हॅक्सिनचा स्लॉट बुक केल्यानंतरही अनेक लोक व्हॅक्सिन घेण्यासाठी सेंटरवर येत नाही. त्यामुळे लस वाया जात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of health) हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, भारतात एका दिवसात 4400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत तब्बल 18 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 22 हजार 315 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या सव्वादोन लाखांच्या खाली आली आहे. कालच्या दिवसात 4 हजार 454 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटले असले, तरी कोरोनाबळींच्या संख्येत वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.

देशाची कोरोनास्थिती
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 67 लाख 52 हजार 447 वर गेला आहे. देशात 2 कोटी 37 लाख 28 हजार 11 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 3 हजार 720 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 27 लाख 20 हजार 716 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण (vaccination) झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 19 कोटी 60 लाख 51 हजार 962 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of health) दिली आहे.

Exit mobile version